‣ आमचे हे विनामूल्य ऍप आपली माहिती गोळा करत नाही व जाहिरातीही दाखवत नाही.
‣ आमची लहान टीम व इतर योगदानकर्ते त्यांच्या मोकळ्या वेळात ह्या ऍप मध्ये सतत सुधार करत असतात
‣ नकाशावर काही चुका किंवा अपूर्ण माहिती असल्यास, OpenStreetMap वर तुम्ही देखील ते सुधारू शकता व ते सुधार भविष्यातील अद्ययावत ऍप मध्ये बघू शकता.
आपल्या अभिप्रायाने व ५ तारांच्या मानांकनाने आम्हाला प्रेरणा मिळते!
महत्वाची वैशिष्टे:
• विनामूल्य, मुक्त स्त्रोत, विनाजाहिराती, माहिती मागोवा (ट्रॅकिंग) नाही
• OpenStreetMap समुदायाच्या कृपेने गुगल नकाशावर अस्तित्वात नसलेल्या ठिकाणांसह तपशीलवार ऑफलाइन नकाशे
• सायकल मार्ग, पादचारी मार्ग व भटकंतीचे मार्ग
• उंची, शिखरे, समोच्च रेषा व चढ-उतार
• चालताना व सायकल/गाडी चालवताना प्रायोगिक ध्वनी सूचनांसह वळणावळणाप्रमाणे मार्गनिर्देशन
• जलद ऑफलाइन शोध
• KML, KMZ, GPX स्वरूपात खूणपत्रे आयात/निर्यात
• तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी "गडद मोड"
ऑरगॅनिक मॅप्समध्ये अँड्रॉइड ऑटो, सार्वजनिक वाहतूक, उपग्रह नकाशे आणि इतर काही वैशिष्ट्ये
अद्याप
उपलब्ध नाही. पण
तुमच्या मदतीने व पाठिंब्याने
, आम्ही ह्यात टप्प्याटप्प्याने सुधार करू शकतो.
ऑरगॅनिक मॅप्स हे प्रेमाने निर्मित, शुद्ध व सेंद्रिय असे आहे:
• अतिजलद ऑफलाइन चालणारे
• तुमच्या गोपनीयतेचा आदर करणारे
• तुमची बॅटरी वाचवणारे
• अनपेक्षित मोबाइल डेटा शुल्क नाही
• महत्त्वाच्या वैशिष्ट्यांसह वापरण्यास सोपे
ऑर्गेनिक मॅप्स हे माहिती मागोवा व इतर वाईट सामग्रीपासून मुक्त आहे:
• जाहिराती नाही
• माहिती मागोवा नाही
• कोणतेही डेटा संग्रहण नाही
• तुम्हाला फोन करत नाही
• कोणतीही त्रासदायक नोंदणी नाही
• कोणतीही अनिवार्य शिकवणी नाही
• कोणताही त्रासदायक ईमेल स्पॅम नाही
• सूचनापत्रे नाही
• हेर सॉफ्टवेअर नाही
• पूर्णपणे सेंद्रिय
गोपनीयता हा मूलभूत मानवी हक्क आहे, असे ऑरगॅनिक मॅप्सचे धोरण आहे:
• ऑरगॅनिक मॅप्स हा एक स्वतंत्र समुदाय-चालित व मुक्त स्त्रोत प्रकल्प आहे
• आम्ही तुमच्या गोपनीयतेचे "बिग टेक"च्या नजरेपासून संरक्षण करतो
• जिथे असाल तिथे सुरक्षित रहा
ह्या ऍप मध्ये "एक्सोडस प्रायव्हसी रिपोर्ट"नुसार शून्य ट्रॅकर्स आणि फक्त किमान आवश्यक परवानग्या आढळतात.
कृपया अतिरिक्त तपशील आणि वारंवार विचारलेले प्रश्नांसाठी
organicmaps.app
संकेतस्थळावर भेट द्या आणि टेलिग्रामवर @OrganicMapsApp वर थेट आमच्याशी संपर्क साधा.
पाळत ठेवण्यास नकार द्या - तुमचे स्वातंत्र्य स्वीकारा.
ऑरगॅनिक मॅप्स वापरून पहा!